शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Sangli: पणुंब्रे वारुणमध्ये ८ मार्चला 'डोंगरी संमेलन'; शेखर गायकवाड यांची संमेलानाध्यक्षपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:58 IST

कोकरुड : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे १४ वे डोंगरी साहित्य संमेलन शनिवार दि. ८ मार्च रोजी आयोजित करण्यात ...

कोकरुड : पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे १४ वे डोंगरी साहित्य संमेलन शनिवार दि. ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक व सनदी अधिकारी शेखर गायकवाड (पुणे) यांची तर कवी संमेलनाचे अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री मनीषा पाटील हरोलीकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक कवी वसंत पाटील आणि स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी दिली.शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुण यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडी नंतर ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालयाचे मैदानावर संमेलनाचे उद्घाटन आमदार सत्यजित देशमुख यांचे हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी प्रा. प्रदीप पाटील उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण तानाजीराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक बळीराम पाटील चरणकर, डालमिया शुगरचे संतोष कुंभार, तानाजी पाटील आणि उद्योजक विश्वास डफळे आदिंच्या उपस्थितीत होणार आहे.तिसऱ्या सत्रात कविसंमेलन होणार असून यामध्ये सुनील यावलीकर, किरण भावसार, वसंत पाटील, भीमराव धुळूबुळू, रघुराज मेटकरी, राजेंद्र टिळे, नंदू गुरव, विष्णू पावले, भारती पाटील, श्रीकांत शिंदे, जयश्री पवार, भगवान पाटील, नथुराम कुंभार, वनिता जांगळे आदींचा सहभाग आहे. सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी सुभाष कवडे भिलवडी हे करणार आहेत. चौथ्या सत्रात प्रसिद्ध ग्रामीण विनोदी कथाकार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांचे कथाकथन होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली