ज्ञानदीप वाचनालयाला रक्कम, साहित्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:19 IST2021-01-10T04:19:41+5:302021-01-10T04:19:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासमोरील शिवाजी हाऊसिंग सोसायटीत असलेल्या ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला पुनउभारणीसाठी ...

Donations to Gyandeep Library | ज्ञानदीप वाचनालयाला रक्कम, साहित्याची मदत

ज्ञानदीप वाचनालयाला रक्कम, साहित्याची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासमोरील शिवाजी हाऊसिंग सोसायटीत असलेल्या ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला पुनउभारणीसाठी मदतीचा ओघ सुरू आहे.

गेल्या पंधरा दिवसांत सुमारे ३५ हजार रुपयांची मदत रोख रक्कम व साहित्य स्वरूपात झाली आहे. मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी व त्यांचे मित्र नंदकुमार बाबर यांनी दहा हजार रुपये, निवृत्त रयत सेवक संघातर्फे अध्यक्ष एस.जी. शिंदे, सचिव देसाई, कार्यकारिणी सदस्य कोळी यांनी पाच हजार रुपये, तर उद्योजक पवन व चेतन शिंदे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सुमारे १२ हजार रुपये किमतीचे फर्निचर वाचनालयाला भेट दिले आहे. वाचनालयाचे संस्थापक-सदस्य निवृत्त प्राचार्य डी. बी. पाटील, अध्यक्ष बी. व्ही. पाटील, उपाध्यक्ष डॉ. मोहन पाटील, खजिनदार विठ्ठल मोहिते, कार्यकारिणी सदस्य धोंडिराम पाटील यांनी या मदतीचा स्वीकार केला. मदतीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

Web Title: Donations to Gyandeep Library