बाळासाहेब चोपडे यांच्याकडून भिलवडी शिक्षण संस्थेस लाखाची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:59+5:302021-08-23T04:28:59+5:30

ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे डॉ. बाळासाहेब चाेपडे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश गिरीश ...

Donation of Rs. 1 lakh to Bhilwadi Education Institute from Balasaheb Chopde | बाळासाहेब चोपडे यांच्याकडून भिलवडी शिक्षण संस्थेस लाखाची देणगी

बाळासाहेब चोपडे यांच्याकडून भिलवडी शिक्षण संस्थेस लाखाची देणगी

ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे डॉ. बाळासाहेब चाेपडे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश गिरीश चितळे यांच्याकडे सुपूर्द केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

भिलवडी : भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एचएससी बोर्डाकडून प्राप्त गुणपत्रकांचे वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक गिरीश चितळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांनी संस्थेस एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश गिरीश चितळे यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी गिरीश चितळे म्हणाले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा. प्रत्येकाने स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास घडवावा. शिक्षण, उद्योग व नोकरी क्षेत्रात कोविडमुळे झालेले बदल आत्मसात करावेत.

बारावी कला, शास्त्र व वाणिज्य शाखेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. सुनील वाळवेकर, डी. के. किणीकर, संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे, पर्यवेक्षक संभाजी माने, विभाग प्रमुख प्रा. जी. एस. साळुंखे यांच्यासह ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक नलवडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. दिनकर जगदाळे यांनी आभार मानले.

Web Title: Donation of Rs. 1 lakh to Bhilwadi Education Institute from Balasaheb Chopde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.