कुपवाड कोविड केअर सेंटरचे देणगीदारांच्या हस्ते लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:27+5:302021-05-23T04:26:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शहर व परिसर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू ...

कुपवाड कोविड केअर सेंटरचे देणगीदारांच्या हस्ते लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : शहर व परिसर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या मोफत कोविड केअर सेंटरचे लोकार्पण देणगीदार रमाकांत घोडके, अभिजित भोसले, विष्णू माने, बल्लू शाकला यांच्याहस्ते करण्यात आले.
शहरातील कोरोनाबाधितांची गैरसोय लक्षात घेऊन लोकसहभागातून हे मोफत कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. मालती डेव्हलपर्सचे मालक रमाकांत घोडके, नगरसेवक अभिजित भोसले व विष्णू माने, उद्योजक बल्लू शाकला यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, उपाध्यक्ष प्रवीण कोकरे, कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, सचिव विलास माळी, खजिनदार प्रकाश व्हनकडे, संचालक मोहनसिंग रजपूत, राजेंद्र पवार, समीर मुजावर, प्रकाश पाटील, अभिजित कोल्हापुरे, विठ्ठल संकपाळ, रूपेश मोकाशी, महावीर खोत, अमोल कदम आदी उपस्थित होते.