भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST2021-01-08T05:26:21+5:302021-01-08T05:26:21+5:30

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेस सुशीला गुजर व सुमन शेटे यांच्याकडून संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे ...

Donation to Bhilwadi Education Institute | भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी प्रदान

भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी प्रदान

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील भिलवडी शिक्षण संस्थेस सुशीला गुजर व सुमन शेटे यांच्याकडून संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्याकडे देणगी सुपूर्द केली.

वसंत शंकर गुजर यांच्या स्मरणार्थ सुशीला वसंत गुजर यांनी २१ हजार रुपये तसेच शंकर शिवाप्पा गुजर यांच्या स्मरणार्थ सुमन श्रीरंग शेटे यांनी २५ हजार रुपये देणगी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास चितळे होते. के. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सुशीला गुजर तसेच स्वाती कोले यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक डॉ. सुनील वाळवेकर यांनी संस्थेस दिलेल्या देणगीबद्दल आभार व्यक्त केले. एस. एस. मोरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी आभार मानले. यावेळी डी. के. किणीकर, एम. आर. पाटील, व्ही. एस. तेली, एम. बी. पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो-०४भिलवडी१

फोटो ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे विश्वास चितळे यांच्याकडे सुमन शेटे, सुशीला गुजर यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी डॉ. सुनील वाळवेकर, डी. के. किणीकर, शुभांगी मन्वाचार, आदी उपस्थित होते.

Web Title: Donation to Bhilwadi Education Institute