शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: टाकळीत कुत्र्यांच्या शर्यतीच्या नावावर श्वानप्रेमींची फसवणूक, जमावाने आयोजकास चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:56 IST

आयोजक बेपत्ता झाल्याने एकच गोंधळ उडाला

मिरज : टाकळी, ता. मिरज येथे कुत्र्यांच्या शर्यतीच्या नावावर पैसे वसूल करून श्वानप्रेमींची लाखोंची फसवणूक करणाऱ्या एकाला जमावाने चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. शर्यतीसाठी कोकण व कर्नाटकातून आलेल्या श्वानप्रेमींची फसवणूक करून सूरज भोसले या आयोजकाने पळ काढल्याने संतप्त जमावाने भोसले याच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.टाकळीत इस्त्री व्यवसाय करणाऱ्या सूरज भोसले या तरुणाने गुरुवारी टाकळीत शिकारी श्वानांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. दुचाकीसोबत श्वान पळविण्याच्या शर्यतीसाठी पहिले बक्षीस दुचाकी, दुसरे बक्षीस फ्रीज व तिसरे बक्षीस सायकल होती. या स्पर्धेची सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आल्याने सांगली, मिरज परिसरासह विजापूर, अथणी, सांगोला, रत्नागिरी येथील सुमारे ५० शिकारी श्वान स्पर्धेत भाग घेण्यासाठी टाकळीत आले होते.स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले होते. गुरुवारी सकाळी सर्वजण टाकळीत ही आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व श्वानांऐवजी केवळ दहा श्वानांना पळविण्यात आले. त्यानंतर आयोजक सूरज भोसले तेथून बेपत्ता झाल्याने एकच गोंधळ उडाला. परजिल्ह्यातून आलेल्या संतप्त श्वानमालक व जमावाने सूरज भोसले याच्या टाकळीतील घराकडे मोर्चा वळविला.भोसले तेथे नसल्याने जमाव संतप्त झाला. गावातील तरुणांनी सूरज भोसले यास शोधून काढत त्यास चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. सूरज भोसले याने श्वानप्रेमींची फसवणूक करून त्यांना सुमारे लाखाचा गंडा घातल्याची तक्रार आहे. श्वानांची बेकायदा शर्यत आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांमुळे अनर्थ टळलाजमावाने भोसले याच्या घरावर चाल केल्यानंतर टाकळीचे पोलीस पाटील संजय माने जमावाला रोखून याबाबत पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी तातडीने टाकळीत जाऊन जमावाला तेथून पांगवून भोसले यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्राPoliceपोलिस