बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:28 IST2021-05-08T04:28:07+5:302021-05-08T04:28:07+5:30

शिराळा : रीळे (ता. शिराळा) येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने छपरात बंधलेला कुत्रा पळवून नेऊन ठार केला. येथील दत्त मंदिर ...

Dog killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार

शिराळा

: रीळे (ता. शिराळा) येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने छपरात बंधलेला कुत्रा पळवून नेऊन ठार केला. येथील दत्त मंदिर परिसरात पहाटे राजाराम गणपती पाटील यांच्या घराजवळ जनावरांच्या शेडमध्ये हा कुत्रा साखळीला बांधला होता. बिबट्याने हल्ला करून कुत्रा दूरवर नेऊन खाल्ल्याचे पाटील यांनी सांगितले. कुत्र्याच्या गळ्यातील साखळी जागेवरच पडली होती. बाजूला रक्त पडले होते. झटापटीच्या खुणा दिसत होत्या.

याअगोदरही बिबट्याने परिसरात शेळ्या, मेंढ्या व दुभती जनावरे ठार केली आहेत.

Web Title: Dog killed in leopard attack