बेडगला पिसाळलेल्या कुत्र्याने वीस जणांचे लचके तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:12+5:302021-06-29T04:19:12+5:30
टाकळी : बेडग (ता. मिरज) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी लहान मुलांसह सुमारे वीस जणांचा चावा घेऊन अनेक जनावरांचे लचके ...

बेडगला पिसाळलेल्या कुत्र्याने वीस जणांचे लचके तोडले
टाकळी : बेडग (ता. मिरज) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी लहान मुलांसह सुमारे वीस जणांचा चावा घेऊन अनेक जनावरांचे लचके तोडले. यामुळे ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली आहे.
बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील खांडेकर-कोरे वस्ती व गावातील गावठाण हद्दीत सुमारे वीस जणांचे पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले. एक वर्षाच्या लहान बालकासह त्याच्या आईवरही कुत्र्याने हल्ला केला. त्यानंतर काशिनाथ शेळके (वय ३) व शिवानी काशिनाथ शेळके (८) घरासमोरील अंगणात खेळत असताना त्यांचा चावा घेतला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रस्त्यावरील काहीजणांवर हल्ला केला.
सुरेश तुकानावर यांची देशी पाडी व संभाजी खांडेकर यांच्या पाळीव कुत्र्यांचे या कुत्र्याने लचके तोडले. रविवारी मध्यरात्रीपासून हा पिसाळलेला कुत्रा जनावरांचे लचके तोडत फिरत असल्याने जनावरे व शेळ्या सुरक्षित राहाव्यात म्हणून काहींनी रात्र जागून काढली.
बेडग येथे मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून झुंडीने फिरणाऱ्या कुत्र्यांकडून ग्रामस्थांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
आरग केंद्रात रेबीज इंजेक्शन उपलब्ध आहे. मात्र,
रुग्णांना अँटीरेबीज सिरम लस घेण्यासाठी व पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिकुर्डेकर यांनी सांगितले.