कुत्र्याचा हल्ला; पाच जखमी

By Admin | Updated: August 31, 2014 23:49 IST2014-08-31T22:37:42+5:302014-08-31T23:49:43+5:30

सांगलीतील घटना : फटाक्यांच्या आतषबाजीने कुत्रे बिथरले

A dog attack; Five injured | कुत्र्याचा हल्ला; पाच जखमी

कुत्र्याचा हल्ला; पाच जखमी

सांगली : विश्रामबाग चौकात फटाक्यांची आतषबाजी झाल्याने एक कुत्रे बिथरले आणि त्याने पाच जणांवर हल्ला करुन चावा घेऊन जखमी केले. आज (रविवार) दुपारी ही घटना घडली. जखमींमध्ये वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला पोलीस अंबिका जावीर यांचाही समावेश आहे.
विश्रामबाग चौकात कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर नेहमी बसलेले असते. दुपारी साडेबारा वाजता याठिकाणी फटाक्यांची जोरात आतषबाजी झाल्याने या टोळक्यातील एक कुत्रे बिथरले. त्याने रस्त्यावरील दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. चौकात वाहतूक सुरळीत करण्यासाठी अंबिका जावीर उभ्या होत्या. कुत्र्याने त्यांच्यासह पाच जणांवर हल्ला केला. यामध्ये हे सर्वजण जखमी झाले.
जखमींना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागले.
कुत्र्याने अर्धा तास धुमाकूळ घातला होता. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाल्याने त्यांची पळापळ झाली. वाहतूकही विस्कळीत झाली होती. काही तरुणांनी हातात काठ्या घेऊन कुत्र्याचा पाठलाग करुन त्याला पिटाळून लावले. कुत्रे शंभर फुटीकडे गेले. (प्रतिनिधी)

Web Title: A dog attack; Five injured