कवलापुरात डॉक्टर तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: May 31, 2014 00:39 IST2014-05-31T00:38:32+5:302014-05-31T00:39:12+5:30

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर स्नेहल विजयकुमार परळीकर

The doctor's woman suicide in Kawalpur | कवलापुरात डॉक्टर तरुणीची आत्महत्या

कवलापुरात डॉक्टर तरुणीची आत्महत्या

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर स्नेहल विजयकुमार परळीकर (वय २३, रा. अंबेजोगाई, जि. बीड) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. काल (गुरुवारी) रात्री अकरा वाजता कवलापुरातच ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलिसांत नोंद आहे. स्नेहल परळीकर या महिन्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिणार्थी डॉक्टर म्हणून नियुक्तीस होत्या. आरोग्य केंद्राशेजारीच त्या भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. त्यांनी बीएएमस पदवी घेतली होती. त्यांचे वडील अंबेजोगाईत बीडीओ आहेत, तर भाऊ सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल आहे. गुरुवारी रात्री त्यांचा भाऊ त्यांना भेटण्यासाठी आला होता. दरवाजाला आतून कडी होती. त्यांनी हाक मारली, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश असता त्यांचा मृतदेह गळफासाने लटकत असल्याचे निदर्शनास आले. पंचनामा करताना पोलिसांना स्नेहल यांच्या वैद्यकीय पुस्तकात एक छायाचित्र मिळाले आहे. यामध्ये स्नेहल व त्यांच्यासोबत एक तरुण आहे. दोघांच्या कपाळाला मुंडवळ्या व गळ्यात हार आहे. त्यांनी विवाह केल्याचे या छायाचित्रावरुन दिसून येते. हे छायाचित्र जप्त केले. छायाचित्रातील तरुण कोडोली (ता. पन्हाळा) येथील आहे. तो नेटकॅफे चालवित असल्याची माहिती आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले. नातेवाईकही दु:खात असल्याने चौकशी थांबली आहे. येत्या एक-दोन दिवसात तपास पूर्ण करुन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. हवालदार प्रताप थोरात तपास करीत आहेत. मला माफ कर गुड्डी पोलिसांनी स्नेहल यांचा मोबाईलही जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये त्यांना कोडोलीच्या तरुणाने एक संदेश पाठविला आहे. ‘तू आता यापुढे माझ्याशी बोलणार नाहीस, तू मला माफ कर गुड्डी’, असे या संदेशामध्ये म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The doctor's woman suicide in Kawalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.