अ‍ॅपेक्सप्रकरणी सांगलीतील डॉक्टर रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:31 IST2021-08-13T04:31:00+5:302021-08-13T04:31:00+5:30

मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी ...

Doctor on radar in Sangli in Apex case | अ‍ॅपेक्सप्रकरणी सांगलीतील डॉक्टर रडारवर

अ‍ॅपेक्सप्रकरणी सांगलीतील डॉक्टर रडारवर

मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूंसह १५ जणांना अटक केली आहे. अ‍ॅपेक्समधील कोविड रुग्णांच्या मृत्यूच्या चाैकशीत सांगलीतील छातीरोग तज्ज्ञ डाॅ. शैलेश बरफे याने डाॅ. महेश जाधव यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. डाॅ. शैलेश बरफे यास चाैकशीस पाचारण केले. यामुळे डाॅ. बरफे याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने डॉ. शैलेश बरफे याने उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने डॉ. शैलेश बरफे याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. यापूर्वी जामिनावर सुटलेल्या चार आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनीही न्यायालयात धाव घेतली आहे.

Web Title: Doctor on radar in Sangli in Apex case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.