डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:18+5:302021-04-09T04:29:18+5:30

सांगली : लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आता काय करावे, काय नको याबाबतचे अनेक प्रश्न लोकांकडून विचारले जात आहेत. यातच मद्यप्रेमींकडून लसीकरणानंतर ...

Doctor, how many days after vaccination do not want to drink alcohol | डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही

डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही

सांगली : लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आता काय करावे, काय नको याबाबतचे अनेक प्रश्न लोकांकडून विचारले जात आहेत. यातच मद्यप्रेमींकडून लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही, हा प्रश्न सतत विचारला जात आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ हैराण झाले आहेत. त्यांनी अशा मद्यप्रेमींना आरोग्याचा चांगला मंत्रही दिला.

जिल्ह्यातील मद्यविक्रीचे आकडे पाहिले तर मद्यप्रेमींची संख्या किती मोठी आहे, हे दिसून येत आहे. त्यामुळे तितक्याच प्रमाणात मद्यविषयी प्रश्न लसीकरणादरम्यान उपस्थित होत आहेत. काहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यास बेदखल करण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी त्याचे पालनही केले. डॉक्टरांच्या मते लसीकरण हे प्रतिकारकशक्ती वाढविण्याचे काम करीत असताना व्यसनांमुळे त्यांच्या या प्रक्रियेत बाधा येत असते. लसीकरणानंतर मद्यपानाचे दुष्परिणाम काय होतात, ही बाब वैद्यकीयदृष्ट्या अद्याप सिद्ध व्हायची असली तरी व्यसनांचे चांगले परिणाम होत नसतात, हा साधा सिद्धांत वैद्यकीय तज्ज्ञ मांडत आहेत.

चौकट

मार्चमधील दारूविक्री

देशी दारू ११,११,०५९ लिटर

विदेशी दारू ४,५९,८२४ लिटर

बिअर ३,९२,१११ लिटर

कोट

कोणतेही व्यसन हे वाईटच असते. रोगाचा सामना करण्यासाठी आपण लस किंवा औषधे घेत असतो. त्याच्याविरोधात व्यसन काम करीत असते. त्यामुळे लसीकरणानंतर व केव्हाही मद्यपान चांगले नाही.

- डॉ.संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली

कोट

मद्यपानामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. लसीकरण केल्यानंतर मद्यपान करणे अयोग्य आहे. मद्यपान व कोणत्याही व्यसनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. त्यामुळे त्यापासून दूर रहावे.

- डॉ. रवींद्र ताटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

कोट

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास रोगास प्रतिबंध करण्याची जी प्रक्रिया सुरू असते त्यास बाधा पोहोचते. केवळ मद्यपानच नव्हे तर सर्व प्रकारची व्यसने ही लसीकरणाचा जो उद्देश आहे, त्याला तडा देण्याचे काम करतात.

- डॉ. विवेक पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी

चौकट

मद्याची विक्री वाढतीच

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मार्चमध्ये जिल्ह्यातील एकूण मद्यविक्री वाढली आहे. देशी दारूची विक्री सव्वातीन लाख लिटरने, विदेशी दारूची विक्री ९९ हजार ८३४ लिटरने, तर बिअरची विक्री एक लाख २३ हजार लिटरने वाढली आहे.

Web Title: Doctor, how many days after vaccination do not want to drink alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.