पाणीपुरी खाताय की टायफाईडला निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:17+5:302021-08-14T04:31:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : टायफाईड अथवा विषमज्वर हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार आहे. दूषित अन्न किंवा ...

Do you eat Panipuri or invite typhoid? | पाणीपुरी खाताय की टायफाईडला निमंत्रण देताय?

पाणीपुरी खाताय की टायफाईडला निमंत्रण देताय?

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : टायफाईड अथवा विषमज्वर हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार आहे. दूषित अन्न किंवा पाण्यामुळे विषमज्वराचा प्रसार होतो. आजकाल उघड्यावरील पदार्थ विशेषत: पाणीपुरी खाण्याची हौस अनेकांना असते. पण हीच पाणीपुरी टायफाईडलाही निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे पाणीपुरीसह उघड्यावरील पदार्थ खाताना नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.

चौकट

जिल्हा रुग्णालयातील टायफाईडचे रुग्ण

जून : २०

जुलै : ३५

ऑगस्ट : १७

चौकट

आजाराची लक्षणे

- उच्च तापमान दर्शवणारा ताप किंवा कमी-अधिक होणारा ताप, काहींना उलट्या, जुलाबही होतात. पोटदुखी, डोकेदुखी होते.

- मलमूत्र विसर्जन करताना जळजळ जाणवते.

चौकट

ही घ्या काळजी

- अस्वच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचे सेवन करू नये.

- कुठलेही पाणी पिणे टाळावे.

- अन्नपदार्थ गरम करून खावेत.

- काही महिने बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत.

Web Title: Do you eat Panipuri or invite typhoid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.