‘जलजीवन’ची कामे योग्य पद्धतीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:53+5:302021-09-05T04:30:53+5:30
फोटो ओळ : शिराळा पंचायत समितीमध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांनी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेतली. लोकमत न्यूज ...

‘जलजीवन’ची कामे योग्य पद्धतीने करा
फोटो ओळ : शिराळा पंचायत समितीमध्ये आमदार मानसिंगराव नाईक यांनी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : तालुक्यातील नागरिकांना माणसी दररोज ५५ लिटर पाणी देणार आहे. त्या दृष्टीने सध्या कार्यरत असलेल्या योजनांत आवश्यकतेनुसार वाढीव पाईपलाईन, पाण्याची टाकी, नवीन विहीर अथवा जुन्या विहिरीचे बळकटीकरण, नवी योजना होणार आहे. त्यांची कामे योग्यपध्दतीने करावीत, असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना गावनिहाय आढावा बैठकीत ते बोलत होते. उपसभापती बी. के. नायकवडी, माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, गटविकास अधिकारी संतोष राऊत, लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रवीण तेली यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जलजीवन योजनेअंतर्गत तालुक्यातील नागरिकांना माणसी दररोज ५५ लिटर पाणी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सध्या कार्यरत असलेल्या योजनांत आवश्यकतेनुसार वाढीव पाईपलाईन, पाण्याची टाकी, नवीन विहीर अथवा जुन्या विहिरीचे बळकटीकरण, नवीन योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ८५ पैकी ६ प्रस्ताव मंजूर असून, पैकी ढोलेवाडी, चरण, फुपेरे व कुसाईवाडी अशी ४ योजनांची कामे सुरू आहेत. ३ योजना निविदा प्रक्रियेत आहेत. २२ योजनांची अंदाजपत्रके तयार, ७ सर्वेक्षण सुरू आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी जलसंधारण अधिकारी बी. बी. हुक्केरी, एस. आर. साळुंखे आदी उपस्थित होते.