म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन्ससाठी रुग्णाच्या नातेवाइकांना पळवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST2021-05-28T04:19:56+5:302021-05-28T04:19:56+5:30

सांगली : म्युकरमायकोसिसची इंजेक्शन्स आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना पळवू नये, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. रुग्णालयांनी ...

Do not run to relatives of the patient for injections of mucomycosis | म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन्ससाठी रुग्णाच्या नातेवाइकांना पळवू नका

म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन्ससाठी रुग्णाच्या नातेवाइकांना पळवू नका

सांगली : म्युकरमायकोसिसची इंजेक्शन्स आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना पळवू नये, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. रुग्णालयांनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांमार्फत आणण्याची सूचना केली आहे.

म्युकरमायकोसिसवर १३ रुग्णालयांत सध्या उपचार सुरू आहेत. त्यासाठीची इंजेक्शन्स जिल्हा परिषदेत उपलब्ध आहेत. खासगी अैाषध दुकानांत मिळत नाहीत. इंजेक्शन्स घेऊन येण्याची जबाबदारी खासगी रुग्णालये रुग्णाच्या नातेवाइकांवर सोपवत आहेत, त्यामुळे जिल्हा परिषदेत गर्दी होत आहे. नातेवाइकांची नाहक ससेहोलपट सुरू आहे. हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी आदेश दिले की, रुग्णालयांनी स्वत:च त्यांची खरेदी करून रुग्णांना द्यावीत. त्यासाठी रुग्णालयाचा एकच कर्मचारी जिल्हा परिषदेत पाठवावा. यामुळे नातेवाइकांचे हाल होणार नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही रुग्णालयांनी आपला हेका सोडला नसल्याचे दिसत आहे. बुधवारी मिरजेतील एका खासगी रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाइकांनाच जिल्हा परिषदेत पाठविले होते.

चौकट

सुमारे ६०० इंजेक्शन्स वापरली

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना दिवसभरात तीन ते चार इंजेक्शन्स द्यावी लागतात. जिल्हा परिषदेतून गुरुवारअखेर ६०० इंजेक्शन्स विकली गेली होती. रुग्णालयांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची माहिती दररोज अपडेट करावी, त्यानुसार कोल्हापुरातून इंजेक्शन्स उपलब्ध करणे सोयीचे होईल, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Web Title: Do not run to relatives of the patient for injections of mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.