थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा तोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:21+5:302021-03-27T04:26:21+5:30
सांगली : थकीत घरगुती वीजबिलात ५० टक्के सवलत द्यावी आणि वसुलीसाठी वीजपुरवठा तोडू नये, अशी मागणी माजी आमदार प्रा. ...

थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा तोडू नका
सांगली : थकीत घरगुती वीजबिलात ५० टक्के सवलत द्यावी आणि वसुलीसाठी वीजपुरवठा तोडू नये, अशी मागणी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना तसे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन काळातील हजारो रुपयांची वीजबिले भरणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. ही बिले एकरकमी स्वरूपात ते भरू शकत नाहीत. त्यामुळे एकूण बिलामध्ये ५० टक्के सवलतीची मागणी जनता दलाने केली आहे. त्यासाठी शासनाकडे पक्षातर्फे पाठपुरावा सुरू आहे. त्यावर निर्णय होईपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये. अंशत: पैसे भरु इच्छिणाऱ्या ग्राहकांना तशी सवलत द्यावी. शिवाय गरीब ग्राहकांना एका महिन्याची सवलत द्यावी.
अधीक्षक अभियंत्यांनी थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे आश्वासन दिले.