वीज कनेक्शन तोडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:24+5:302021-02-17T04:32:24+5:30

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील सयाजी कदम आणि ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या पेठचे सहा अभियंता विकास देसाई ...

Do not disconnect the power connection | वीज कनेक्शन तोडू नये

वीज कनेक्शन तोडू नये

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील सयाजी कदम आणि ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या पेठचे सहा अभियंता विकास देसाई यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की, वीजबिल न भरलेल्या ग्राहकांची वीज कनेक्शन बंद करून नयेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना पार्श्र्वभूमीवर शासनाचे सध्या मंत्री असणारे नितीन राऊत यांनी सांगितले होते की, कोरोनाच्या काळातील १ ते १०० युनिटपर्यंत असणाऱ्या ग्राहकांची वीज बिले माफ केली जाणार होती. त्याचे काय झाले. जोपर्यंत हा निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत वीज कनेक्शन बंद करू नयेत. गेली दोन ते चार दिवस झाले महावितरण कंपनीच्याकडून वीज कनेक्शन्स बंद केली जात आहेत. ती प्रक्रिया थांबली जावी, अशी १८० सह्यांच्या निवेदनाव्दारे विनंती केली आहे.

Web Title: Do not disconnect the power connection