परवानगीशिवाय नदीत खासगी बोट आणू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:30+5:302021-06-20T04:19:30+5:30
सांगली : सरकारी घाटावरील पाणीपातळीची महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शनिवारी पाहणी करीत आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची माहिती घेतली. परवानगीशिवाय ...

परवानगीशिवाय नदीत खासगी बोट आणू नये
सांगली : सरकारी घाटावरील पाणीपातळीची महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शनिवारी पाहणी करीत आपत्कालीन यंत्रणेच्या सज्जतेची माहिती घेतली. परवानगीशिवाय खासगी बोट नदीपात्रात आणल्यास ती जप्त करण्यात येईल, असा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला.
महापालिका आयुक्त कापडणीस यांनी शनिवारी आपत्ती यंत्रणांची माहिती घेतली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे आणि अग्निशमन जवान उपस्थित होते. नदीची पाणीपातळी वाढत चालली तर प्रथम बाधित होणाऱ्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
काही तरुण मंडळे नदीपात्रात आपल्या खासगी बोटी घेऊन विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणीही खासगी बोट नदीपात्रात आणल्यास त्या बोटी जप्त करून बोटी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला.
नदीपात्रात पाणी पाहण्यासाठी नागरिक विनाकारण नदीकाठावर गर्दी करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदीकाठावर किंवा घाटावर गर्दी करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
चौकट
पुलावरून उडी मारण्यास बंदी
दरवर्षी अनेकजण आयर्विन पुलावरून नदीपात्रात उड्या मारत असतात. नदीची पाणी पातळी अधिक असल्याने आता पुलावरून नदीत उड्या मारण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे कोणीही पुलावरून उड्या मारल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा आयुक्तांनी दिला.