येडेनिपाणीत १२ पासून ज्ञानेश्वरी पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:54+5:302021-02-10T04:26:54+5:30
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शुक्रवार १२ फेब्रुवारीपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे राजारामबापू पाटील ...

येडेनिपाणीत १२ पासून ज्ञानेश्वरी पारायण
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शुक्रवार १२ फेब्रुवारीपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे राजारामबापू पाटील बँकेचे संचालक डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले.
कोरोना जंतुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या पारायण सोहळ्यात सुरक्षित अंतर व मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. सलग ३४ व्या वर्षी होणाऱ्या पारायणावेळी ह.भ.प.अशोक इनामदार मुख्य अधिष्ठाता म्हणून काम पहाणार आहेत. काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, भजन, प्रवचन, हरिनाम व नामजप, कीर्तन व जागर असा नित्यक्रम राहणार आहे. १८ फेब्रुवारीस काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे नियोजन केले जाणार आहे.
दिगंबर यादव, सुरेश कदम, विनोद खंडागळे, यशवंत माने, निवास खरात, पांडुरंग पाटील यांची प्रवचने होणार आहेत. मोहन पाटील, विलास लोहार, माणिक थोरात, दीपक पाटील, बाळासाहेब पाटील, बी. के. पाटील, बंडा माळी, राजेंद्र पाटील संयोजन करीत आहेत.