बुधगावच्या दिव्यांग मैत्रिणींनी केले कळसूबाई शिखर सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:27 IST2021-01-08T05:27:45+5:302021-01-08T05:27:45+5:30

औरंगाबादमधील शिवूर्जा प्रतिष्ठान दिव्यांगांचे मनोबल उंचावण्याच्या हेतूने मागील नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. संघटनेचे कार्यकर्ते ३१ डिसेंबरला दिव्यांगांचे ...

Divyang Maitrini of Budhgaon did Kalsubai Shikhar Sir | बुधगावच्या दिव्यांग मैत्रिणींनी केले कळसूबाई शिखर सर

बुधगावच्या दिव्यांग मैत्रिणींनी केले कळसूबाई शिखर सर

औरंगाबादमधील शिवूर्जा प्रतिष्ठान दिव्यांगांचे मनोबल उंचावण्याच्या हेतूने मागील नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे. संघटनेचे कार्यकर्ते ३१ डिसेंबरला दिव्यांगांचे पथक कळसूबाई शिखर सर करण्यासाठी घेऊन जातात. यंदा या उपक्रमात राज्यातील ७० दिव्यांगांसोबत बुधगावातील माधुरी मकरंद पाटील आणि राजश्री राजाराम शिंदे या मैत्रिणी सहभागी झाल्या हाेत्या.

बुधगावातील शिक्षक ग्रुप, माजी सैनिक संघटना व रणांगण प्रतिष्ठानने या मैत्रिणींच्या जिद्दीला दाद देत सत्कार केला. आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण कांबळे यांनी त्यांचे ‘काळजातला बाप’ हे पुस्तक त्यांना भेट दिले. यावेळी क्रीडाशिक्षक वैभव बंडगर, अजित पाटील, सुधीर पाटील, दिलीप गोसावी, युवराज साठे, सर्पमित्र गजानन जाधव, रणांगणचे विजय पाटील, माजी सैनिक दिनेश माने, प्रवीण माने, पालक राजाराम शिंदे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.

फाेटाे : ०६ बुधगाव १

ओळ : कळसुबाई शिखर सर करणाऱ्या माधुरी पाटील, राजश्री शिंदे यांचा बुधगाव येथे आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण कांबळे यांनी ‘काळजातला बाप’ पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

Web Title: Divyang Maitrini of Budhgaon did Kalsubai Shikhar Sir