जिल्ह्याचे तापमान ३३ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:07+5:302021-01-19T04:28:07+5:30
सांगली : जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात सोमवारी वाढ झाली. कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस ...

जिल्ह्याचे तापमान ३३ अंशावर
सांगली : जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात सोमवारी वाढ झाली. कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदले गेले. यात काहीअंशी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्याच्या तापमानात गेल्या दोन दिवसांपासून वाढ होत आहे. कमाल तापमानात येत्या दोन दिवसात अंशाने वाढ होणार आहे. किमान तापमान आठवडाभर २० अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत आकाश निरभ्र राहणार आहे. जानेवारीतील सरासरी तापमानापेक्षा किमान तापमान सध्या ६ अंशाने तर कमाल तापमान अंशाने अधिक आहे. त्यामुळे तापमानात सध्या मोठी वाढ दिसत आहे. जानेवारीअखेरपर्यंत थंडी पडण्याची शक्यता कमी दिसत आहे. २४ तारखेपर्यंत तापमान असेच स्थिर राहणार असून कमाल तापमानात थोडी वाढच होणार आहे.