जिल्हा संस्कृत संमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:25+5:302021-05-28T04:20:25+5:30
संजयनगर : संस्कृत भारतीद्वारा तीन वर्षांनी घेतले जाणारे संस्कृत संमेलन या वर्षी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आले. सांगली, सातारा, कोल्हापूर, ...

जिल्हा संस्कृत संमेलन उत्साहात
संजयनगर : संस्कृत भारतीद्वारा तीन वर्षांनी घेतले जाणारे संस्कृत संमेलन या वर्षी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आले. सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, पुणे तसेच काही संस्कृतप्रेमी अमेरिका, इंग्लंड येथून सहभागी होते.
डॉ. वंदना शिराळकर यांनी शुभेच्छा दिल्या. गणेश गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. डॉ. मेघा गुळवणी यांनी संस्कृत आणि भारतीय संस्कृती याबद्दल विचार मांडले. संस्कारवर्गाचे प्रमुख अनिल रुईकर, श्रीधर जोशी यांनी माहिती सांगितली.
प्रमुख वक्ते म्हणून बंगळुरू येथून सत्यनारायण भट्ट यांनी विविध उपक्रमांतून संस्कृत भाषेचे पुनरुत्थान करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे मत मांडले.
अध्यक्षीय भाषणात संमेलनाध्यक्षा रूपाली वाडेकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेचा सखोल अभ्यास करून त्यामध्ये संशोधन करावे, असे आवाहन केले.
पंडित तुपे शास्त्री यांनी प्रास्ताविक केले. रघुवीर रामदासी यांनी आभार मानले. रंजन कार्यक्रमात कौशिकी देशपांडे, प्रतीक्षा पाटील, अस्मिता माळी, यशश्री जोशी यांनी सहभाग घेतला. रूचा शिदोरे, हर्षदा बेडेकर, वनिता गुरव यांनी सूत्रसंचालन केले. संतोष देशपांडे, अवनी कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.