जिल्हाभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:35+5:302021-01-14T04:21:35+5:30

सांगली : जिल्ह्यात होत असलेल्या १४३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्री पोलीस दलाने जिल्हाभर ...

District police combing operation | जिल्हाभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

जिल्हाभर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

सांगली : जिल्ह्यात होत असलेल्या १४३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्री पोलीस दलाने जिल्हाभर कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांनाही दंड करण्यात आला. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा यावेळी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जिल्हाभर ऑपरेशन ऑलआऊट मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली असून, यातील ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता १४३ ग्रामपंचायतींसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कायदा, सुव्यवस्थेचा आढावा घेत व गुन्हेगारांवर कारवाईसाठी याचा उपयोग झाला. यात रात्री अकरानंतर सुरू असलेल्या ढाबे, बिअरबारवरही कारवाई करण्यात आली.

Web Title: District police combing operation