जिल्हा पोलीस प्रमुखांची पूरपट्ट्यातील भिलवडी, आमणापूरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:40+5:302021-06-03T04:19:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी, आमणापूरसह पलूस तालुक्यातील विविध गावांना ...

जिल्हा पोलीस प्रमुखांची पूरपट्ट्यातील भिलवडी, आमणापूरला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी, आमणापूरसह पलूस तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतला.
प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी आपत्कालीन स्थितीशी दोन हात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
गेडाम म्हणाले की, भिलवडी, अंकलखोप, ब्रम्हनाळ, खटाव, सुखवाडी, चोपडेवाडी, भुवनेश्वरवाडी, धनगाव, माळवाडी, आमणापूर या गावांचे मोठे नुकसान झाले होते. संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य द्यावे. योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास संकटावर मात करता येते.
भिलवडी येथे तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, तलाठी जी. बी. लांडगे, माजी जि. प. सदस्य संग्राम पाटील, सरपंच सविता महिंद, सीमा शेटे, शहाजी गुरव, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी आमणापूर गावी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, वैभव उगळे, सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, उपसरपंच मंगल तातुगडे, मोहन घाडगे, यशवंत आंबी, अशोक काटे, आदी उपस्थित होते.