जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST2021-01-08T05:28:38+5:302021-01-08T05:28:38+5:30

सांगली : शिक्षक साहित्य मंडळातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलन झाले. शिक्षक पुरस्कार, साहित्यिक गौरव, परिसंवाद, काव्यसंमेलन ...

District level teacher literature convention in full swing | जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात

जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात

सांगली : शिक्षक साहित्य मंडळातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शिक्षक साहित्य संमेलन झाले. शिक्षक पुरस्कार, साहित्यिक गौरव, परिसंवाद, काव्यसंमेलन असे उपक्रम झाले.

रमेश हेगडे (साळशिंग मळा, आटपाडी), सुरेखा कांबळे (हरोली, ता. कवठेमहांकाळ), सदाशिव फाळके (ढवळेश्वर, ता. खानापूर), जालिंदर पाटील (हिंगणगाव खुर्द), सुषमा डांगे (बेडग), मंगेशकुमार कांबळे (सागाव), कल्पना सावंत (अचकनहळ्ळी, ता. जत ), शिवाजी मोरे (तासगाव ), अंजली यादव (पेठ), विठ्ठल खुटाण (भिलवडी), गजानन पाटील (शामरावनगर, सांगली ) यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजित पाटील व स्वागताध्यक्षपदी सचिन कुसनाळे होते. साहित्यिक प्रा. अरुण कांबळे यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले. परिसंवादामध्ये रमेश जावीर, अजित पाटील, विजय जंगम सहभागी होते. मुबारक उमराणी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. कुसनाळे यांच्या ‘मी अस्तिक का विश्ववाद’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

संमेलनाला नटराज मोरे, प्रकाश साखरे, गोपाळ कबनूरकर, सुधा पाटील, मच्छिंद्र ऐनापुरे, मंदाकिनी पकाळ, विजय दळवी आदी उपस्थित होते. संयोजन संजीवनी कुलकर्णी, मनीषा रायजादे, योगिता कवठेकर, वंदना हुलबत्ते आदींनी केले.

------

Web Title: District level teacher literature convention in full swing