सागावमध्ये पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:27 IST2021-07-28T04:27:27+5:302021-07-28T04:27:27+5:30

पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील पूरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. येथील ...

District Collector inspects flood affected area in Sagav | सागावमध्ये पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

सागावमध्ये पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथील पूरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. येथील बौद्ध वसाहत, लोहार गल्ली, टेकेश्वर गल्ली, थळपांढर परिसर, गणपती मंदिर परिसराचा काही भाग, फुले पाणंद परिसराला वारणा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. सात ते आठ कुटुंबांची घरेच जमीनदोस्त झाली आहेत. गावातील २४७ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले होते. जिल्हाधिकारी चौधरी यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सरपंच तात्या पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, ग्रामसेवक आर.डी. पाटील, एम.आर. पाटील, दीपक जाधव, किरण फातले, आनंदा आपटे, आनंदा पाटील, जयसिंग पाटील, बाळू करांडे, अजित कांबळे, मनोज पाटील, पांडुरंग पाटील उपस्थित होते.

Web Title: District Collector inspects flood affected area in Sagav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.