जिल्हा बँकेची ऑनलाईन सेवा शिराळा तालुक्यात विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:44+5:302021-09-05T04:30:44+5:30
पुनवत : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात जिल्हा बँकेची ऑनलाईन सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. ग्राहक तसेच बँक कर्मचाऱ्यांना नाहक ...

जिल्हा बँकेची ऑनलाईन सेवा शिराळा तालुक्यात विस्कळीत
पुनवत : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात जिल्हा बँकेची ऑनलाईन सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. ग्राहक तसेच बँक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे.
शिराळा तालुक्यातील पुनवत, कणदूर, सागाव, चिखलीसह पश्चिम भागात जिल्हा बँकेची ऑनलाईन सेवा सातत्याने बंद पडत आहे. अनेक शाखेतील आर्थिक देवघेवीसह सर्व ऑनलाईन कामे खोळंबत आहेत. ग्राहकांना बँकेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास होत आहे. ग्राहक-कर्मचारी यांच्यात यावरून वादवादीचे प्रसंग उद्भवत आहेत. जिल्हा बँकेच्या एकेका शाखेत अनेक गावांतून ग्राहक येत असतात. अशातच ऑनलाईन सेवा बंद पडली, तर ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ यंत्रणेने याबाबत तातडीने पावले उचलावीत व सुरळीत सेवा द्यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.