जिल्हा बँकेचे अडीच हजारावर मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:56+5:302021-09-04T04:31:56+5:30

सांगली : जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप मतदार यादीत २५७३ पात्र सभासद आहेत. ...

District Bank has over two and a half thousand voters | जिल्हा बँकेचे अडीच हजारावर मतदार

जिल्हा बँकेचे अडीच हजारावर मतदार

सांगली : जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप मतदार यादीत २५७३ पात्र सभासद आहेत. त्यामध्ये २२१९ संस्था सभासद, तर ३५२ व्यक्तिगत व एक कंपनी सभासद आहे. खासदार, आमदारांसह आजी-माजी संचालकांचा यात समावेश आहे. बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा कस लागणार आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मतदार यादी अंतिम करण्याचा आदेश काढला होता. त्यानुसार कोल्हापूरच्या विभागीय सहनिबंधकांनी प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा आदेश गुरुवारी काढल्यानंतर निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले होते. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी शुक्रवारी जाहीर झाली. या यादीवर दि. १३ सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत असून, दि. २२ सप्टेंबरपर्यंत हरकतींवर निर्णय होणार आहे. दि. २७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्हा बॅँकेच्या प्रारूप मतदार यादीत २,५७३ पात्र सभासद आहेत. यात २,२१९ संस्था सभासद आहेत, तर ३५२ व्यक्तिगत व एक कंपनी सभासद आहे. २२१९ संस्था सभासदांत ७६५ विकास सोसायट्यांचे सभासद आहेत. दूध, पशू पैदास, वराह पालन, कुकुटपालन, शेळी-मेंढी पालन, पाणीपुरवठा व शेंग उत्पादक आदी इतर शेती संस्था गटात ३३३, खरेदी विक्री संघ, साखर कारखाने, ऑइल मिल, सूतगिरण्या आदी कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था गटात ७१, नागरी सहकारी बॅँका, पतसंस्था, ग्रामिण बिगर शेती पतसंस्था, पगारदार नोकरांच्या संस्था गटात ६४९, तर ग्राहक, गृहनिर्माण, औद्योगिक प्रक्रिया-उत्पादन, मजूर संस्था, सर्वसाधारण संस्था या गटात ४०१ सभासद आहेत.

बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असून, विकास सोसायटी गटातील चार ते पाच जागा तरी बिनविरोध होतील. बाकीच्या १५ ते १६ जागांवर निवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौकट

मतदार यादीत दिग्गज नेते

बॅँकेच्या प्रारूप मतदार यादीत दिग्गज नेत्यांची नावे आहेत. विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार अजितराव घोरपडे, दिनकर पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, तानाजी पाटील, बाबासाहेब मुळीक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, अनिता सगरे आदी सर्वपक्षीय नेत्यांचा मतदार यादीत समावेश आहे.

Web Title: District Bank has over two and a half thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.