जिल्हा बँकेच्या मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:33+5:302021-09-03T04:27:33+5:30
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया आज, शुक्रवार, दि. ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रारूप मतदार यादी ...

जिल्हा बँकेच्या मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया आज, शुक्रवार, दि. ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार आहे. हरकती, सुनावणीनंतर २७ सप्टेंबरला मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात ऐन दिवाळीच्या धामधुमीत नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मतदार यादी अंतिम करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार कोल्हापूरच्या विभागीय सहनिबंधकांनी प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याचा आदेश गुरुवारी काढला. या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर सोमवार, दि. १३ सप्टेंबरपर्यंत यादीवर आक्षेप, हरकती घ्यायच्या आहेत. त्या दोन प्रतीत सादर करायच्या आहेत. बुधवार, दि. २२ सप्टेंबरला प्राप्त आक्षेपावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम निर्णय देणार आहेत. यानंतर सोमवार, दि. २७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ऐन दिवाळीच्या धामधुमीत नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहेत. सध्या जिल्हा बँकेत सर्वपक्षीय संचालक आहेत. विद्यमान संचालकांना सहा वर्षांहून अधिक काळ काम करण्याची संधी मिळाली आहे. नव्याने संचालक होण्यासाठी दहाही तालुक्यांतून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे.