सावकारांची देणी भागविण्यासाठी बँकेवर डल्ला जिल्हा बँक अपहार प्रकरण

By Admin | Updated: September 3, 2014 23:59 IST2014-09-03T23:57:12+5:302014-09-03T23:59:16+5:30

बँकेच्या रकमेवर डल्ला मारल्याचे चौकशी अहवालात उघडकीस आले आहे.

District bank assault case | सावकारांची देणी भागविण्यासाठी बँकेवर डल्ला जिल्हा बँक अपहार प्रकरण

सावकारांची देणी भागविण्यासाठी बँकेवर डल्ला जिल्हा बँक अपहार प्रकरण

  गली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तुंग शाखेतील अपहारप्रकरणी निलंबित लिपिक व शिपायाने खासगी सावकारांची देणी भागविण्यासाठी बँकेच्या रकमेवर डल्ला मारल्याचे चौकशी अहवालात उघडकीस आले आहे. येत्या दोन दिवसांत हा अहवाल प्रशासक शैलेश कोतमिरे यांना सादर केला असून, त्यानंतर दोघांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या तुंग शाखेकडील लिपिक प्रताप धनवडे याने खातेदारांच्या पासबुक आणि बंँकेकडील रेकॉर्डमध्ये रकमेच्या वेगवेगळ्या नोंदी करून अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा बँकेत खळबळ उडाली होती. प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी धनवडे यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले होते. बँकेच्या मुख्य कार्यालयातील अधिकारी अजित पाटील, लेखापरीक्षक फारूक फरांडे यांच्या पथकाची चौकशीसाठी नियुक्ती केली होती. या अपहारात शाखेतील एका शिपायाचाही समावेश आढळून आल्यानंतर त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. सध्या तुंग शाखेच्या लेखापरीक्षणाचे काम सुरू झाले आहे. प्राथमिक चौकशीत शाखेत सुमारे २५ लाखांची अफरातफर झाल्याचे आढळून आले होते. प्राथमिक चौकशीनंतर प्रशासक कोतमिरे यांनी दोघांना अपहाराची रक्कम भरण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली आहे. दोघांकडून साडेसहा लाख रुपयांच्या रकमेचा भरणा बँकेकडे करण्यात आला आहे. उर्वरित रकमेच्या वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, समितीच्या चौकशीत या दोघांनी तुंगमधील खासगी सावकार व इतर लोकांकडून लाखो रुपये घेतले होते. ही रक्कम फेडण्यासाठी त्यांनी बँकेतील रकमेत अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. येत्या दोन दिवसांत हा चौकशी अहवाल प्रशासकांना सादर होणार आहे. अपहाराच्या रकमेची वसुली सुरू असली तरी अहवालानंतर या दोघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: District bank assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.