बिझनेस पीपल्सतर्फे ट्रॅक्टर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:28+5:302021-08-23T04:29:28+5:30
फोटो - आरळा (ता. शिढराळा) येथील बिझनेस पीपल्स शाखेच्या वतीने मंजूर झालेल्या ट्रॅक्टरची चावी शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी ...

बिझनेस पीपल्सतर्फे ट्रॅक्टर वाटप
फोटो - आरळा (ता. शिढराळा) येथील बिझनेस पीपल्स शाखेच्या वतीने मंजूर झालेल्या ट्रॅक्टरची चावी शेतकऱ्यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी गंगाराम पाटील, स्वप्निल पाटील, सचिन चौगुले उपस्थित होते.
वारणावती : बिझनेस पीपल्सच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या उद्योग व व्यवसायासाठी आर्थिक विकास महामंडळाकडून कर्जे मिळवून देऊ. त्याचा फायदा डोंगरी विभागातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन बिझनेस पीपल्सचे संस्थापक स्वप्निल पाटील यांनी केले.
आरळा (ता. शिराळा) येथील बिझनेस पीपल्सच्या वतीने बळीराम मांडवकर यांना ट्रॅक्टर प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वप्निल पाटील म्हणाले, ग्रामीण-अतिग्रामीण, तसेच डोंगराळ व मागास भागात बँकेची शाखा विकासासाठी वाहक म्हणून काम करते. अर्थव्यवस्थेसाठी बँकांची मदत होते. गरजवंतांना कर्जे मिळतात. शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतो, छोटा व्यापारी दुकानासाठी कर्ज घेतो, बेरोजगार युवक स्वयंरोजगारासाठी कर्ज घेतो यातूनच त्या त्या गावातील आर्थिक व्यवहाराला चालना मिळते.
बिझनेस पीपल्सचे आरळा शाखेचे व्यवस्थापक सचिन चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी संतोष सपाटे, रंगराव शेडगे, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, गंगाराम पाटील, एन. जी. पाटील, भरत गुंडगे, अनिल झाडे, बजरंग पाटील, शिवाजी कुंभार उपस्थित होते.
220821\img-20210820-wa0125.jpg
आरळा ता.शिराळा येथे बिझनेस पीपल्स च्या वतीने ट्रॅक्टर प्रदान करताना