पाचुंब्री येथे अनुदानावर घरगुती आटा चक्कीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:06+5:302021-04-01T04:27:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : लोकहिताच्या कामास प्रथम प्राधान्य देऊन शिराळा विधानसभा मतदारसंघाची जडणघडण सुरू आहे, असे प्रतिपादन युवा ...

पाचुंब्री येथे अनुदानावर घरगुती आटा चक्कीचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : लोकहिताच्या कामास प्रथम प्राधान्य देऊन शिराळा विधानसभा मतदारसंघाची जडणघडण सुरू आहे, असे प्रतिपादन युवा नेते विराज नाईक यांनी केले.
पाचुंब्री (ता. शिराळा) येथे पन्नास टक्के अनुदानावर घरगुती आटाचक्कीच्या वितरणप्रसंगी बोलत होते. सरपंच अरुण सव्वाखंडे प्रमुख उपस्थित होते.
युवा नेते नाईक म्हणाले, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विशेष तालुक्याच्या उत्तर विभागाला सातत्याने विकासात झुकते माप दिले गेले आहे. युवा उद्योजक सोमनाथ शेटे, शैलेश शेटे व मेघश्याम आवटे यांच्या सहकार्याने आटाचक्कीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हर्षद माने यांनी प्रास्तविक केले. येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून गावातील ५० कुटुंबाना आटाचक्की उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील सुषमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कैलास पाटील, शंकर पाटील, राजेंद्र माने, वसंत झेंडे, अभिजित सव्वाखंडे, सुरेखा सव्वाखंडे, संगीता पाटील, प्रणव पाटील उपस्थित होते.