कसबे डिग्रजमध्ये रुग्णांना शिरखुर्मा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:21+5:302021-05-18T04:27:21+5:30

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कोरोना अलगीकरण कक्षामध्ये ईद सणानिमित्त कोरोना रुग्णांना शिरखुर्मा वाटप करण्यात आले. ...

Distribution of Shirkhurma to patients in Kasbe Digraj | कसबे डिग्रजमध्ये रुग्णांना शिरखुर्मा वाटप

कसबे डिग्रजमध्ये रुग्णांना शिरखुर्मा वाटप

फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कोरोना अलगीकरण कक्षामध्ये ईद सणानिमित्त कोरोना रुग्णांना शिरखुर्मा वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. अमानुल्ला तांबोळी, आनंदराव नलावडे, आदी उपस्थित होते.

लोकमत न्युज नेटवर्क

कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे मुस्लिम बांधवांनी ईदचा सण अलगीकरण कक्षामधील कोरोनाग्रस्तांसमवेत साजरा केला.

येथील तांबोळी परिवाराच्या वतीने कोरोना रुग्णांना शिरखुर्मा वाटप करण्यात आले. डिग्रजमध्ये तांबोळी परिवाराने एक सामाजिक बांधीलकी म्हणून ईदचा सण साजरा करत सामाजिक बांधीलकी जपली.

यावेळी डॉ. अमानुल्ला तांबोळी, प्रा. सनाउल्लाह तांबोळी, अस्लम तांबोळी, काका तांबोळी, आनंदराव नलावडे, प्रा. बाळासाहेब मासुले, संजय शिंदे, रमेश काशीद, आरोग्य अधिकारी डॉ. शरद कुवर, आरोग्य सेवक मनोज कोळी, आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of Shirkhurma to patients in Kasbe Digraj