विक्रम सावंत यांच्याकडून शीर कुरमा मसाला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST2021-05-13T04:26:16+5:302021-05-13T04:26:16+5:30

फोटो ओळ : संख (ता.जत) येथे आ. विक्रम सावंत यांच्याकडून रमजान ईदनिमित्त शीर कुरमा मसाला वाटप केले. यावेळी बंडू ...

Distribution of Sheer Kurma Masala by Vikram Sawant | विक्रम सावंत यांच्याकडून शीर कुरमा मसाला वाटप

विक्रम सावंत यांच्याकडून शीर कुरमा मसाला वाटप

फोटो ओळ : संख (ता.जत) येथे आ. विक्रम सावंत यांच्याकडून रमजान ईदनिमित्त शीर कुरमा मसाला वाटप केले. यावेळी बंडू शेख, एम. आर. जिगजेणी, हणमंतराव पाटील, सायबगौडा पाटील, अब्बास सैय्यद, मैनुदीन जमादार उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : आमदार विक्रम सावंत यांच्याकडून रमजान ईदनिमित्त जत तालुक्यातील ४४०० मुस्लीम कुटुंबांना शीर कुरमा मसाला वाटप करण्यात आले. संख येथेही मुस्लीम कुटुंबाला शीर कुरमा मसाला वाटप केले.

तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव वाढ होत असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. दुकाने बंद असल्यामुळे रमजान ईद साजरी करण्यात अडचणी होती. म्हणून आमदार विक्रम सावंत यांनी तालुक्यातील १२० गावातील ४४०० मुस्लीम

कुटुंबाना शीर कुरमा मसाला वाटप केले.

संख येथे आमदारचे स्वीय सहायक बंडू शेख, माजी उपसरपंच एम. आर. जिगजेणी, हणमंतराव पाटील, सायबगौडा पाटील यांच्या हस्ते मुस्लीम जमातचे प्रमुख अब्बास सैय्यद, मैनुदिन जमादार यांना वाटप केले.

यावेळी मुस्लीम समाज प्रमुख अब्बास सैय्यद, मैनुद्दीन जमादार, एम. आर. जिगजेणी, हनुमंतराव पाटील, सायबगौंडा पाटील, बंडू शेख, अमोल कुलकर्णी, राजेभक्षर जमादार, अब्दुल तेग्गेळी, रियाज जमादार उपस्थित होते.

Web Title: Distribution of Sheer Kurma Masala by Vikram Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.