इस्लामपुरात ‘संगांयोे’ पेन्शन पत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:48 IST2021-02-06T04:48:11+5:302021-02-06T04:48:11+5:30
इस्लामपूर : येथील मंत्री कॉलनी परिसरात जयंत दारिद्र्य निर्मूलनाच्या माध्यमातून गरीब अनाथ, वृद्ध, विधवा, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार ...

इस्लामपुरात ‘संगांयोे’ पेन्शन पत्रांचे वाटप
इस्लामपूर : येथील मंत्री कॉलनी परिसरात जयंत दारिद्र्य निर्मूलनाच्या माध्यमातून गरीब अनाथ, वृद्ध, विधवा, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार पेन्शन मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
बूथ अध्यक्ष राहुल नागे, मालन सुनील वाकळे, भटके विमुक्त शहर अध्यक्ष मोहन भिंगार्डे, सामाजिक न्याय शहर अध्यक्ष गोपाल नागे, मंडल अधिकारी कैलास कोळेकर, विशाल सूर्यवंशी, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संदीप माने, जयंत दारिद्र्य निर्मूलनचे समन्वयक पिरजादे, राजेंद्र जाधव, रणजित तेवरे, पांडुरंग कांबळे, अमेय देशपांडे, सचिन नाथगोसावी, महिला अध्यक्षा रोझाताई किणीकर, युवती अध्यक्षा प्रियांका सांळुखे यांच्यासह प्रभागातील महिला, नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - ०४०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर पेन्शन न्यूज
इस्लामपूर येथे मंत्री कॉलनी परिसरात संजय गांधी योजनेतील मंजूर पेन्शनपत्रांचे वाटप संजय पाटील, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील, संदीप माने यांच्याहस्ते करण्यात आले.