वाळव्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:44+5:302021-09-18T04:28:44+5:30
वाळवा : पालकमंत्री मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून अपंग व विधवा परित्यक्ता महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन ...

वाळव्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप
वाळवा : पालकमंत्री मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून अपंग व विधवा परित्यक्ता महिलांना संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन मंजुरीचे पत्र याेजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
वाळवा येथील दिनकरराव थोरात (सरकार) विकास सेवा सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. उपसभापती नेताजी पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी पाटील म्हणाले, शासनाची याेजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पाेहाेचविण्याचा प्रयत्न आहे. उपसभापती नेताजी पाटील म्हणाले, अपंग व विधवा परित्यक्ता महिला संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नयेत. त्यांची जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानअंतर्गत काळजी घेतली जाईल.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद थोरात, गुरुवर्य लालासाहेब पाटील विकास सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष जालिंदर थोरात, तुषार धनवडे, सचिन मुळीक उपस्थित होते.