पेठ येथे निराधार योजना पत्राचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:26+5:302021-02-08T04:23:26+5:30
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप या योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या ...

पेठ येथे निराधार योजना पत्राचे वाटप
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप या योजनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी युवा नेते अतुल पाटील, बाजार समितीचे संचालक संदीप पाटील, ज्येष्ठ नेते शरद पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संजय पाटील म्हणाले, शासनाने ही चांगली योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे निर्धार आहेत त्यांना मदत होते आहे. अशा समाजिक काम करण्यीची संधी नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यांचे सोने करूया यासाठी आपल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. यावेळी भागवत पाटील, रवींद्र पाटील, शिवाजी पाटील, रामसिंग वारके, हणमंतराव कदम शिवराज पाटील, शुभम पाटील, संतोष पाटील, दीपक जाधव उपस्थित होते.
फोटो - ०७०२२०२१-आयएसएलएम- पेठ न्यूज
पेठ (ता. वाळवा) येथे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप संजय पाटील, अतुल पाटील, संदीप पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.