आष्टा शहरातील मुस्लिम समाजाच्या घरकुलांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:31+5:302021-02-05T07:20:31+5:30
आष्टा : आष्टा नगरीचे शिल्पकार विलासराव शिंदे यांचे आष्टा शहरातील प्रत्येक नागरिकाला घरकुल देण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. ...

आष्टा शहरातील मुस्लिम समाजाच्या घरकुलांचे वाटप
आष्टा : आष्टा नगरीचे शिल्पकार विलासराव शिंदे यांचे आष्टा शहरातील प्रत्येक नागरिकाला घरकुल देण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या विचारानेच आष्टा पालिका राज्यात आदर्शवत काम करत आहे, असे प्रतिपादन पालिकेतील पक्षप्रतोद विशाल शिंदे यांनी केले.
येथील आष्टा - तासगाव रस्त्यावरील मुस्लिम समाजासाठी बांधलेल्या घरकुल योजनेमधील २४ घरकुलांचे लाभार्थ्यांना चिठ्ठी टाकून वाटप करण्यात आले. आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्या हस्ते घरकुलांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
ते म्हणाले, आष्टा शहर हे घरकुलांचे शहर आहे. केंद्र व राज्याच्या विविध योजना आष्टा शहरात राबविण्यात येत आहेत. यावेळी झीनत आत्तार, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, धैर्यशील शिंदे, नूर मोहम्मद मुल्ला, शेरनवाब देवळे, साजिद इनामदार, शकील मुजावर, राजू आत्तार उपस्थित होते.
फोटो - ३१०१२०२१-आयएसएलएम-आष्टा घरकुल वाटप न्यूज
आष्टा येथील मुस्लिम समाज घरकुल वाटप कार्यक्रमात वैभव शिंदे व विशाल शिंदे यांचा शेरनवाब देवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी झुंजारराव पाटील, स्नेहा माळी, तेजश्री बोंडे, झीनत आत्तार आदी उपस्थित होते.