शिक्षक समितीकडून किनरेवाडी शाळेस साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:26+5:302021-07-02T04:18:26+5:30

कोकरुड : जिल्हा परिषद शाळेच्या मॉडेल स्कूल या उपक्रमास शिक्षक संघटनांनी मदत करावी. या गट शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी ...

Distribution of materials to Kinrewadi school by teachers committee | शिक्षक समितीकडून किनरेवाडी शाळेस साहित्य वाटप

शिक्षक समितीकडून किनरेवाडी शाळेस साहित्य वाटप

कोकरुड : जिल्हा परिषद शाळेच्या मॉडेल स्कूल या उपक्रमास शिक्षक संघटनांनी मदत करावी. या गट शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत शिराळा तालुका शिक्षक समितीने किनरेवाडी (ता. शिराळा) या जिल्हा परिषद शाळेस मॉडेल स्कूलच्या निमित्ताने ५० पुस्तकांचा संच जिल्हा परिषद सदस्य शारदा पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक अधिक देसाई यांच्याकडे देण्यात आला.

किनरेवाडी शाळेच्या उपशिक्षिका करुणा मोहिते, मुख्याध्यापक व कवी साहित्यिक वसंत पाटील यांचा सेवापूर्ती निमित्ताने सत्कार केला. कार्यक्रमास शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष सदाशिव पाटील, शंकर भोसले, रुग्णालयाचे संचालक संजय रोकडे, शिराळा तालुका अध्यक्ष प्रताप सावंत, शहर अध्यक्ष सुभाष नलवडे, किसन भाष्टे, सचिव सचिन देसाई, कार्याध्यक्ष उत्तम नायकवडी, आकाराम पाटील, महादेव हवलदार, वसंत कुंभार, राम डिगे, बबन मोरे आदी उपस्थित होते. अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अधिक देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of materials to Kinrewadi school by teachers committee