नेर्ले येथे प्रतिराज फाऊंडेशनच्यावतीने साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:47 IST2021-02-18T04:47:09+5:302021-02-18T04:47:09+5:30

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रतिराज फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने सवलतीचे दरात ...

Distribution of materials on behalf of Pratiraj Foundation at Nerle | नेर्ले येथे प्रतिराज फाऊंडेशनच्यावतीने साहित्य वाटप

नेर्ले येथे प्रतिराज फाऊंडेशनच्यावतीने साहित्य वाटप

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रतिराज फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने सवलतीचे दरात साहित्य वाटप युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना शेती उपयुक्त साहित्य पंप, विद्युत मोटर, घरगुती आटाचक्की, अक्वागार्ड, तसेच आधारकार्ड दुरुस्ती, किसान कार्ड, रजिस्ट्रेशन आयुष्यमान भारत कार्ड याची नोंदणी करण्यात आली.

यावेळी प्रतिराज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य निवास माने, सुयोग पाटील, पंकज पाटील यांनी संयोजन केले. शेती उपयुक्त साहित्याची लाभार्थी ५१, आधार कार्ड लाभार्थी ४५ ,किसान क्रेडिट कार्डचे लाभार्थी १५०, आयुष्मान भारत ५० लाभार्थी झाले. ग्रामस्थांनी योजनेचा लाभ घेतला.

फोटो - १७०२२०२१-आयएसएलएम-नेर्ले न्यूज

नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रतिराज फौंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी पाटील, शुभम पाटील उपस्थित होते.

Web Title: Distribution of materials on behalf of Pratiraj Foundation at Nerle