वायफळेत मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:37+5:302021-05-30T04:22:37+5:30
गेल्या काही दिवसांत गावात कोरोनाचा फैलाव गतीने होत आहे. गावासह मळेभागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लॉकडाऊन करून कोरोना आटोक्यात ...

वायफळेत मास्क, सॅनिटायझरचे वाटप
गेल्या काही दिवसांत गावात कोरोनाचा फैलाव गतीने होत आहे. गावासह मळेभागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लॉकडाऊन करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही दररोज रुग्णसंख्येत भरच पडत आहे. शिवाय आजपर्यंत अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. गावातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत खासदार संजयकाका पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांत घराघरांत मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. गावातील सैनिक मळा, भ. पा. मळा, कडेमळा, डुबे मळा, घोडके मळा, तळेवस्ती या भागासह गावभागातील घराघरांत या फाउंडेशनने मास्क आणि सॅनिटायझर पोहोच केले.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून लोकांना ही मदत करण्यात आली. याकामी खंडेराया व्यायाम संस्था, नेहरू युवा मंडळ, शिवगणेश कला क्रीडा मंडळ, तळेवस्ती, शिवप्रतिष्ठान, घोडके मळा, सिद्धेश्वर कला क्रीडा मंडळ, भ. पा. मळा, कडेमळा, जय बजरंग बली कुस्ती केंद्र, शंभूराजे पैलवान ग्रुप, श्री गणेश कला क्रीडा मंडळ, सैनिक मळा, श्रीनाथ प्रतिष्ठान, भीमतेज ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले.