सांगलीत काँग्रेसतर्फे मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:21+5:302021-05-22T04:25:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरात मास्क, सॅनिटायझर, औषधांच्या किटचे वाटप ...

सांगलीत काँग्रेसतर्फे मास्क, सॅनिटायझर, औषधांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरात मास्क, सॅनिटायझर, औषधांच्या किटचे वाटप करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
काँग्रेस भवन येथे सकाळी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर राजीव गांधी यांची प्रतिमा असलेले मास्कचे वाटप करण्यात आले. प्रभाग क्र. ९ मधील नगरसेवक संतोष पाटील व नमराह मशीद संचालित नमराह डेडीकेटेड कोविड सेंटर याला रुग्णांच्या उपचारासाठी औषध, सॅनिटायझर देण्यात आले. शहर युवक काँग्रेसच्यावतीने रुग्ण व नातेवाइकांकरिता जेवणाचे वाटप करण्यात आले.
पोलीस, स्वच्छता कर्मचारी, रिक्षाचालक, भाजी विक्रेते, व्यापाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, नगरसेवक संतोष पाटील, बिपीन कदम, रवींद्र खराडे, सनी धोत्रे, महावीर पाटील, देशभूषण पाटील, अल्ताफ पेंढारी, नेमिनाथ बिरनाळे, अजित ढोले, अमित पारेकर उपस्थित होते.