शिवजयंतीच्या खर्चातून लोककलाकारांना कीट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:05+5:302021-05-14T04:26:05+5:30
शिवजयंती उत्सवाचा खर्च टाळून विविध कलाकारांना नितीन शिंदे, स्वाती शिंदे यांच्याहस्ते कीट वाटप करण्यात आले. यावेळी प्रसाद रिसवडे, संतोष ...

शिवजयंतीच्या खर्चातून लोककलाकारांना कीट वाटप
शिवजयंती उत्सवाचा खर्च टाळून विविध कलाकारांना नितीन शिंदे, स्वाती शिंदे यांच्याहस्ते कीट वाटप करण्यात आले. यावेळी प्रसाद रिसवडे, संतोष पाटील, सुरेश गरड आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वंदेमातरम् शिवाेत्सव मंडळातर्फे सांगलीतील व शिवभक्त कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. दरवर्षी उत्सवामध्ये योगदान देणाऱ्या शाहीर, तुतारी वादक, हलगी वादक, तलवार व दांडपट्टा खेळणारे, मंडप व स्पीकर व्यावसायिक यांची यंदा लॉकडाऊनमुळे हलाखीची स्थिती निर्माण झाली आहे. अशा सुमारे २०० कुटुंबीयांना कीटचे वाटप झाले. उत्सवाच्या खर्चातून कीटची तरतूद करण्यात आली. माजी आमदार नितीन शिंदे व नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांच्याहस्ते वाटप झाले. प्रारंभी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन केले.
यावेळी प्रसाद रिसवडे, संतोष पाटील, सुरेश गरड, सुनीता इनामदार आदी उपस्थित होते.