मिरजेत रेशन दुकानातून निकृष्ट तांदळाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:05+5:302021-08-25T04:32:05+5:30
मिरज : मिरजेत स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे तांदूळ वाटप करण्यात येत आहे. कोरोना साथीदरम्यान शासनाने गरिबांसाठी रेशन ...

मिरजेत रेशन दुकानातून निकृष्ट तांदळाचे वाटप
मिरज : मिरजेत स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे तांदूळ वाटप करण्यात येत आहे. कोरोना साथीदरम्यान शासनाने गरिबांसाठी रेशन दुकानात कमी किमतीत धान्य योजना सुरू केली आहे. मात्र, रेशन दुकानांतून निकृष्ट दर्जाचे तांदूळ वाटप करण्यात येत आहे. खाण्यायोग्य नसलेला तांदूळ नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मिरज शासकीय गोदामातून मिरज तालुक्यातील रेशन दुकानदारांना धान्य वाटप होते. ऑगस्ट महिन्यात गोंदिया येथून आलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे. मात्र, हा तांदूळ रेशन दुकानदारांना वाटप करण्यात आला आहे. धान्य दुकानदारांना या तांदळाच्या वाटपासाठी दबाव असल्याने ग्राहक व रेशन धान्य दुकानदारांमध्ये वादावादी होत आहे. शासनाने खराब तांदूळ बदलून द्यावा, अशी मागणी ग्राहक व दुकानदारांनी केली आहे. गेल्या महिन्यात सार्वजनिक वाटपासाठी निकृष्ट दर्जाचा गहू आला होता. ऑगस्ट महिन्यात निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळाला आहे. मात्र, पुरवठा विभाग नित्कृष्ट धान्याच्या वाटपाची सक्ती करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत नाराजी आहे.