आष्टा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ९ मध्ये माजी केंद्रप्रमुख पांडुरंग शेळके, सागर कांबळे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी मंगल पाटील, फरीदा मकानदार, समीर नायकवडी, ज्योत्स्ना कांबळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील वटवृक्ष इन्फोटेक फौंडेशन फॉर न्यू जनरेशन यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा क्रमांक ९ आष्टा येथे मोफत वह्या वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे शाळा बंद आहेत; मात्र ऑनलाईन आणि ऑफलाईन तास सुरू असून, विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी वह्या असणे आवश्यक आहे. म्हणूनच शाळेतील विद्यार्थ्यांना माजी केंद्रप्रमुख पांडुरंग शेळके आणि शिक्षक सागर कांबळे यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती मंगल पाटील, शिक्षिका फरिदा मकानदार, ज्योत्स्ना कांबळे, नीलम साळुंखे, शिक्षक दयानंद लोखंडे, समीर नायकवडी आणि संतोष नागरगोजे उपस्थित होते.