आष्टा येथे औषध विक्रेत्यांकडून वृद्धाश्रमात खाऊ वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST2021-09-26T04:29:24+5:302021-09-26T04:29:24+5:30
फोटो : आष्टा येथील आधार वृद्धाश्रमात जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त खाऊ वाटपप्रसंगी प्रदीप पाटील, संग्राम कुंभार, प्रवीण पाटील आदी उपस्थित ...

आष्टा येथे औषध विक्रेत्यांकडून वृद्धाश्रमात खाऊ वाटप
फोटो : आष्टा येथील आधार वृद्धाश्रमात जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त खाऊ वाटपप्रसंगी प्रदीप पाटील, संग्राम कुंभार, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आष्टा येथील आधार वृद्धाश्रमातील वृद्धांना खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संचालक प्रवीण पाटील, आष्टा शहर अध्यक्ष संग्राम कुंभार, प्रदीप पाटील यांच्या हस्ते हे वाटप झाले.
राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांच्या हस्ते शहरातील सर्व केमिस्टचा गौरव करण्यात आला. वैभव शिंदे म्हणाले, आष्टा शहरातील सर्व केमिस्टनी महापूर व कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कामगिरी बजावली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेडिकल दुकाने सुरू ठेवून सामाजिक भान जपले आहे.
प्रदीप पाटील म्हणाले, आष्टा शहरातील सर्व औषध दुकान चालकांनी कोरोना संकटात प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत जनतेला सहकार्य केले. विविध सामाजिक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी आशिष बारवडे, संजय शिंदे, स्वप्नील वाकळे, विजय आटुगडे, उमेश जगताप, अमित पाटील, शंकर दमामे, प्रवीण खोत आदी उपस्थित होते.