आष्टा तहसील कार्यालयात फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:59+5:302021-05-10T04:25:59+5:30
आष्टा येथील अतिरिक्त तहसील कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे व सहकाऱ्यांना वैभव शिंदे यांच्या हस्ते फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात ...

आष्टा तहसील कार्यालयात फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर वाटप
आष्टा येथील अतिरिक्त तहसील कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे व सहकाऱ्यांना वैभव शिंदे यांच्या हस्ते फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील माने, सुहास मेथे, महेश गायकवाड उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील सांगली जिल्हा मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने अपर तहसील कार्यालय आष्टा येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कर्मचाऱ्यांना फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी कृषिभूषण सुनील माने, मराठा युवा संघटनेचे सुहास मेथे, शिवसम्राट फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गायकवाड, वरदराज शिंदे, अनिकेत निकम, राजवर्धन थोरात, इंद्रजित हिरुगडे, दत्तराज हिप्परकर, दीपक थोटे, सागर जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.