नेर्लेत दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:13+5:302020-12-14T04:38:13+5:30
नेर्ले : ग्रामपंचायत नेर्लेच्यावतीने ५ टक्के निधीतून दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संजय ...

नेर्लेत दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नेर्ले : ग्रामपंचायत नेर्लेच्यावतीने ५ टक्के निधीतून दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप संजय गांधी निराधार योजनेचे वाळवा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी एम. डी. चव्हाण यांनी स्वागत केले. दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष नागराज चांदकोटी, सरपंच छायाताई रोकडे, उपसरपंच विश्वास पाटील, माजी सरपंच संभाजी पाटील, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी ५२ लाभार्थींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य माणिक पाटील, अनिल साळुंखे, शरद बल्लाळ, सविता पाटील, कृष्णाजी माने, विजय पाटील, जयवंत माने, प्रदीप माने, अक्षय चव्हाण, शंकर माने आदी उपस्थित होते.
फोटो ओळ-
१३१२२०२०-आयएसएलएम-नेर्ले
फोटो ओळ :
नेर्ले (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय पाटील, संभाजी पाटील, सरपंच छायाताई रोकडे उपस्थित होते.