खाेतवाडीत शंकर मोहिते यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:37+5:302021-09-19T04:27:37+5:30
ते सोनवडे पैकी खोतवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप ...

खाेतवाडीत शंकर मोहिते यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
ते सोनवडे पैकी खोतवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. शंकर मोहिते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य भेट दिले. त्याचे वाटप गटशिक्षण अधिकारी प्रदीप कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख हरिभाऊ घोडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. नामदेव डाकोरे यांनी प्रास्ताविक केले. शंकर मोहिते यांनी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर व केंद्र प्रमुख हरिभाऊ घोडे यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रकांत बेलवलकर, युवराज फसाले, श्रीकांत दाभोळकर, किशोर शिंदे, मधुकर खोत, प्रकाश भाष्टे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश भाष्टे यांनी आभार मानले.
फोटो : १८ वारणावती १
ओळ : सोनवडे पैकी खोतवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेतील शंकर मोहिते, प्रदीप कुडाळकर, हरिभाऊ घोडे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
180921\1538-img-20210917-wa0012.jpg
खोतवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील मुलाना शैक्षणिक साहित्य वाटप करताना.शंकर मोहिते,प्रदीप कुडाळकर व अन्य मान्यवर.