आरसीएफच्या वतीने संगणक वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:27+5:302021-04-06T04:25:27+5:30
राजारामनगर येथे आरसीएफच्या वतीने शाळांना जयंत पाटील यांच्या हस्ते संगणक संच देण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, संदीप कदम, ...

आरसीएफच्या वतीने संगणक वाटप
राजारामनगर येथे आरसीएफच्या वतीने शाळांना जयंत पाटील यांच्या हस्ते संगणक संच देण्यात आले. यावेळी प्रा. शामराव पाटील, संदीप कदम, बाळासाहेब पाटील, भीमराव पाटील, इलियास पिरजादे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाईजर्स लि.,चेंबूर-मुंबई (आरसीएफ) च्या वतीने वाळवा तालुक्यातील १५ शाळा व वाचनालयांना साडेपाच लाख रुपये किमतीचे संगणक संच भेट देण्यात आले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या संगणक संचांचे राजारामनगर येथे शाळा व वाचनालयांना वाटप करण्यात आले.
राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीने आरसीएफकडे वाळवा तालुक्यातील शाळा व वाचनालयांना देण्यासाठी संगणक संचांची मागणी केली होती. इस्लामपूरचे पुत्र व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आरसीएफ कर्मचारी संघाचे सरचिटणीस संदीप कदम यांनी पुढाकार घेऊन हे संगणक संच मिळवून दिले आहेत.
यावेळी प्रा.शामराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, भीमराव पाटील, दारिद्र्य निर्मूलन अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे प्रामुख्याने उपस्थित होते.